रत्नागिरी : शिवसेना महिला शहर संघटक सौ. पूजा दीपक पवार यांच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यंदा हे हळदी कुंकवाचे चौथे वर्ष होते. साळवी स्टॉप येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर येथे हा समारंभ आयोजित केला होता. या समारंभाचे औचित्य गाण्याची मैफिलही रंगली. या ठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्याचा आनंद महिलांनी घेतला. जिजाऊ ग्रुप महिला मंडळ या कार्यक्रमाचे व्यवस्थापक होते.
सर्व महिलांनी एकत्र यावे आणि मनोरंजनाचे क्षण अनुभवावे हाच उद्देश ठेवून या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पूजा पवार या शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्याला नागरिकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद मिळत असतो.
सौ. पूजा पवार आयोजित हळदी-कुंकू समारंभाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती
