रत्नागिरी : वायंगणी येथे एपीजे अब्दुल कलाम वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. वायंगणीतील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक मराठी शाळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालयाचे उदघाट्न गावातील ज्येष्ठ नागरिक शंकर सालम यांच्या शुभहस्ते झाले.
त्यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी व पालक तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील मुलांनी देशभक्तीपर हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषांमध्ये भाषणे केली. सर्व मुलांनी संगीतावर विविध कवायत प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपिका माळी, सहकारी शिक्षिका आदिती सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.