रत्नागिरी:-इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित उत्तरायण २०२५ -फूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निव्हलला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला.
येथील जयेश मंगल पार्कमध्ये तीन दिवसांचा हा महोत्सव पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, सोनाली कदम आणि शोभना कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पहिल्या दिवशी सायंकाळी झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात दोन हजाराहून अधिक महिला उपस्थित होत्या. महोत्सवात ५७ स्टॉल्स आणि १२ फ़ूड स्टॉल्स होते. तिन्ही दिवशी हजारो रत्नागिरीकरांनी भेट देऊन खरेदीचा आणि अस्सल चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि महिला उद्योजकांना भरभरून प्रोत्साहन दिले. सामाजिक कार्य करणाऱ्या आविष्कार संस्थेला विनामूल्य स्टॉल देण्यात आला.
लहान मुलांचे डान्स शो, कार्टून कॅरॅक्टरची धमाल, लकी ड्रॉ, फनी गेम्स अशी धमालही महोत्सवात होती. ओसवाल डिझाइनमार्फत बक्षिसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाला जेएसडब्लू एनर्जी लिमिटेड, मनहा इंटरनॅशनल ब्रँडेड सायकल अँड टॉइज, निमेशजी नायर, आहार हॉटेल, हॉटेल मेजवानी, प्रवीण ट्रेडर्स, के.एस. पोवार बिल्डर्स, स्वानंद ज्वेलर्स, पंजाब नेशनल बँक, रोटेरियन रूपेश पेडणेकर, साक्षी फूड्स, लक्ष्मी इंफ्रास्ट्रक्चरचे गणेश जोशी यांचे प्रायोजकत्व लाभले.
कार्यक्रमासाठी रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊनचे दादा कदम, बिपिनचंद्र गांधी, डॉ. वामन सावंत, केदार माणगावकर, गणेश जोशी, प्रवीण लाड यांनी मोलाची मदत केली. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे सदस्यही उपस्थित होते. इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या टीमने पहिल्याच वर्षी हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. इव्हेंट चेअरमन सौ. तन्वी तुषार साळुंखे आणि इव्हेंट को-ऑर्डिनेटर डॉ. प्रियांका मयूर कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. रोटेरियन डॉ. संदीप करे यांनी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मार्गदर्शन केले. इनर व्हील क्लब यापुढेदेखील नावीन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवेल, असे यावेळी क्लबच्या अध्यक्ष डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी सांगितले.