ट्रायने (TRAI) नुकतेच सर्वच टेलिकॉम कंपन्यांना स्वस्तातील प्लॅन लाँच करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. खरे तर, असे प्लॅन ज्यांत युजर केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएसचा फायदा मिळवू शकेल.
कारण असे अनेक युजर्स आहेत, जे २ सिम कार्ड वापरतात आणि त्यांना इच्छा नसतानाही डेटा प्लॅन खरेदी करावा लागतो. ट्रायच्या सूचनेनंतर, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनने असे प्लॅन लॉन्च केले होते. यानंतर आता BSNL नेही असेच प्लॅन्स आणले आहेत. तर जाणून घेऊयात या प्लॅन संदर्भात…
BSNL चा बेस्ट प्रीपेड प्लॅन –
BSNL 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये आपल्याला 17 दिवसांचा वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा आहे. हे एक प्रकारचे कॉलिंग व्हाउचर आहे, कारण ते अमर्यादित कॉलिंगची सुविधा प्रदान करते. याचा वापर आपण संपूर्ण देशभरात कुठेही करू शकता. मुंबई आणि दिल्ली देखील या प्लॅन अंतर्गत येतात.
BSNL 439 रुपयांचा प्लॅन –
BSNL 439 रुपयांचा प्लॅनदेखील असाच आहे. यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 300 SMS मिळतात. याची वैधता 90 दिवसांची आहे. BSNL चे हे प्लॅन वॉइस कॉल आणि SMS सह येतात. तसेच असेच बेनिफिट्स आपल्याला एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियामध्येहीमिळतात.
आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत –
BSNL ने VoLTE सर्व्हीस संपूर्ण देशभरात सुरू केलेली नाही. मात्र कंपनीकडून 4G चे जाळे अत्यंत झपाट्याने पसरवले जात आहे. आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी मेड-इन-इंडिया टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे.