इंस्टाग्रामवर रिल्ससाठी गाडया फिरवणे पडले महाग
चिपळूण : इन्स्टाग्रामचे रील्स तयार करण्यासाठी चिपळूण पालिकेच्या पवन तलाव मैदानावर चारचाकीने ‘धुराळा’ उडविणे येथील तिघांच्या चांगलेच अंगलट आहे आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्यावर चिपळूण पालिकेने संबंधितांकडून प्रत्येकी 20 हजार 576 याप्रमाणे एकूण 61 हजार 728 रुपयांचा दंड वसूल केला आहे. हा प्रकार अनावधानाने झाला असून आमच्यावर कायदेशीर कारवाई करू नका अशी लेखीस्वरूपात माफीसुद्धा या तिघांनी चिपळूण पालिकेकडे मागितली आहे.
पराशर मिलिंद गोंधळी (पेठमाप, गाडी क्रमांक एमएच 08 एवाय 6264), शार्दीक शशिकांत साळवी (कोंढे-मधलीवाडी, गाडी क्रमांक एम एच 08 ए एन 8114) आणि हमदन मुबीन रुमानी (गुहागरनाका, गाडी क्रमांक एम एच 04 एफएफ 6489) अशी दंडात्मक कारवाई झालेल्यांची नावे आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पवनतलाव मैदान हे शहरातील खेळाडुप्रेमींचे वैभव असुन सदर चे मैदानाची दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी आयोजीत भारतीय प्रजास्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा झालेनंतर मध्याननंतर सदरील मैदानावरती काही अज्ञात इसमानी चार चाकी वाहनाचे स्टंट्बाजी करुन मैदानाची दैयनिय अवस्था केली होती. मैदानाची प्रचंड नासधुस झाल्याने खेळाडुंकडुन देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सदरील प्रकरणाची एक विडिओ क्लिप सोशल मिडियावरती व्हायरल असुन सदरचे व्हिडिओ क्लिप मध्ये ३ चार-चाकी वाहने आढळूण आले. सदरील प्रकरणी चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले साहेब यांनी ३ ही वाहनांचा तपास केला.
गाडी मालकांच्या नावे नगर परिषदेकडून दि. २८/०१/२०२५ रोजी संबंधिताना नुकसान भरपाईचे नगर अभियंता यांचे मार्फ़त इस्टीमेंट तयार करणेत आले असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदर मैदानाची नुकसान भरपाई रक्कम रुपये ६१,७२८/- मात्र आली असुन संबंधितांवर प्रत्येकी रक्कम रुपये २०,५७६/- मात्र ची रक्कमेची नोटीस दि. २८/०१/२०२५ रोजी देण्यात आली होती. सदर प्रकरणी रक्कम रुपये ६१,७२८/- मात्र संबंधितांकडून नगर परिषदेने वसुल केले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधितानी नगर परिषदेला झालेला प्रकार अनवधानाने झाला आहे जाणून बुजुन कोणत्याही प्रकारे नुकसान करण्याची आमची इच्छा नव्हती मैदानात गाडी घेवुन जाणेस प्रतिबंध आहे हेआम्हाला माहित नसल्याने आमचे कडुन चुक झाली आहे. तरी या पुढे असे कृत्य आमचे कडुन घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तरी आमचे विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करु नये ही विनंती करुन माफ़ी मागितली आहे.