▪️ पी एस बने इंटरनॅशनल स्कूलचे आयोजन
▪️ शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन
▪️ मराठीतील विविध बोलींचा समावेश
देवरुख / प्रतिनिधी :- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यात मराठीचा जयघोष करणारा पहिलाच सांस्कृतिक कार्यक्रम साडवली येथील पी. एस.बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोमवारी सायंकाळी अत्यंत जल्लोषात आणि तेवढ्यात शिस्तबद्ध नियोजनात संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रम कसा असावा ? याचे हा कार्यक्रम म्हणजे एक उत्तम उदाहरण होते असेच म्हणावे लागेल .
डिसेंबर जानेवारी या महिन्या दरम्यान सर्वच शाळा महाविद्यालयातून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम म्हणजे वर्षभरात शाळांमधून पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांचा एक भागच असतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून साडवली येथील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलने संस्था सचिव माजी आमदार सुभाष बने आणि संचालक रोहन बने यांच्या संकल्पनेतून संगमेश्वर तालुक्यात प्रथमच मराठी भाषेचा जल्लोष करणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आपल्या शाळेचे वेगळेपण तालुका वासियांसमोर ठेवले.
जल्लोष मराठी भाषेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना यासाठी जे नियोजन करण्यात आले, ते निश्चितच अभिनंदनीय असे म्हटले पाहिजे. मराठीतील सर्व बोलींचे नृत्याच्या माध्यमातून या सांस्कृतिक कार्यक्रमात अत्यंत बहारदार असे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांनी सादर केलेली नांदी पाहून आणि ऐकून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले. सध्याच्या काळात जेथे नाटकातूनही नांदी ऐकू येत नाही, तेथे शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदी ऐकायला मिळणे हे भाग्याचेच म्हटले पाहिजे. शाळेचे शिक्षक विनोद निंबाळकर शिक्षिका शिवानी शिवलकर – विचारे या दोघांनी केलेले सूत्रसंचालन अत्यंत कसदार असे होते. बोलीभाषेला अनुसरून या दोघांनी केलेले निवेदन कार्यक्रमाला अत्यंत साजेसे ठरले. स्टेजच्या मागे असणारा भव्य स्क्रीन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. कार्यक्रम स्थळी केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, प्रत्येक गीताला कोरिओग्राफरने घेतलेली मेहनत विद्यार्थी नृत्य सादर करत असताना दिसून येत होती.
सर्व कार्यक्रम सादर होत असताना पी. एस .बने इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांसह संस्था सचिव सुभाष बने, संचालक रोहन बने यांचे सर्वत्र अत्यंत बारकाईने लक्ष होते.मुख्याध्यापक मेटकरी यांचे देखील कार्यक्रमाच्या नियोजनावर बारीक लक्ष होते. जल्लोष मराठी भाषेचा या स्वागत गीताने तर, उपस्थितांमध्ये नवचैतन्य पसरले. विशेष निरीक्षणाची बाब म्हणजे या प्रशालेतील मुली शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असताना पेटी वादन, गायन, नृत्य आणि अभिनय या सर्वच कलाक्षेत्रात विशिष्ट उंचीवर पोहोचल्या असल्याचे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणादरम्यान दिसून आले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला ? याचे नाट्याद्वारे सादरीकरण, म्हणजे प्रशालेच्या कल्पकतेची एक उंच भरारीच होती. भारुड , कोळी नृत्य , मालवणी – कोकणी भाषेतील गीतांचे सादरीकरण पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा अक्षरशा जल्लोष केला. जल्लोष मराठी भाषेचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करताना आयोजकांनी अत्यंत बारकाईने अभ्यास करून आपल्या सादरीकरणात वसई जवळचे कुपारी गाव देखील सोडले नाही. यावर आधारित छोट्या मुलांनी सादर केलेल्या एका सुंदर कोळी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. धनगरी नृत्य , कोल्हापूरच्या रांगडी भाषेवर नृत्य अशा मराठीतील सर्व बोलीभाषा वर आधारित असणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने मराठीचा गौरव करणारा ठरला. नेपथ्य, वेशभूषा, रंगपट सारं काही दर्जेदार होतं. जल्लोष मराठी भाषेचा या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित सारेच प्रेक्षक भारावून गेले आणि अखेरीस त्यांनी टाळ्यांच्या जल्लोषाने या कार्यक्रमाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, राजापूर लांजाचे आमदार किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, लेखक डाँ. सुरेश जोशी, उद्योजक सुरेश बने, साडवलीचे सरपंच संतोष जाधव, शंकर शेट्ये, लांजाचे पदाधिकारी कुरूप आदि मान्यवर