संगमेश्वर : तालुक्यातील देवडे रामवाडी येथील सुंदराबाई लक्ष्मण धुमक (७०) या गुरूवार २३ जानेवारी रोजी दु. २ वा. देवरुख आगारातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. यानंतर नातेवाईकांनी सुंदराबाई बेपत्ता झाल्याची फिर्याद देवरूख पोलीस ठाण्यात दिली. त्यांचा शोध सुरू असताना मंगळवार 28 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देवरूख पठारवाडीतील जंगलमय भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबतची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.