रत्नागिरी/जमीर खलफे:- मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले. मृत्युपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच करायचे असा संकल्प केला होता. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे त्यांची मुलगी दर्शना बापट व जावई मोहन बापट तसेच भावे यांचे मित्र नेत्रदान, देहदान चळवळीचे कार्यकर्ते समाजसेवक समीर करमरकर, विनायक शितुत यांच्या पुढाकाराने भावे यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले.
देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजुषा रावळ, शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिले.
शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.