जिल्हास्तरावर करणार चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व
सावर्डे- 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त पंचायत समिती चिपळूण शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व व समूहगीत गायन स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेने घवघवीत यश संपादन केले असून चिपळूण तालुक्यात वर्चस्व निर्माण केले आहे.
या स्पर्धा प्राथमिक गट सहावी ते आठवी व माध्यमिक गट नववी ते बारावी अशा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेत गार्गी घडशी या विद्यार्थिनी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर स्पृहा पवार हिने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वक्तृत्व स्पर्धेत स्वरांगी पाटील प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या समूहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात तृतीय क्रमांक तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून यश मिळवले आहे. प्राथमिक गटात अनुष्का गुरव, श्रेया होडे, वेदा शेंबेकर, अंतरा निर्मळ, शमिका सुर्वे, मनिकर्निका गुडेकर माध्यमिक गटातून सोनम होडे, सलोनी मालप, वैष्णवी जाधव, प्रीती घाणेकर,प्रेरणा हुमने,मानसी सावर्डेकर, समृद्धी राडे,कोमल पंडित, वृंदा पिरधनकर,संस्कृती घाग, सानिका खेराडे यांनी सहभाग नोंदवला. तबला साथ सोहम गोसावी व हार्मोनियम वादक म्हणून स्वर्णिम भुवड लक्षवेधी कामगिरी केली. या सर्व स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यांना अनुजा बागवे,अमृता घाग,जयंत काकडे,श्वेता मोरे व माजी ज्येष्ठ शिक्षक दिलीप डंबे तसेच सर्व मराठी विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व विश्वस्त शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक सर्व संचालक पदाधिकारी, क्रीडा प्रबोधनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, सिद्धार्थ निकम,प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून सावर्डे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त शांताराम खानविलकर प्राचार्य राजेंद्र वारे व मान्यवर