न्यायालयाचे आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने हस्ते वितरण
प्रतिनिधी : सावर्डे / चिपळूण
चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसाळ येथील एका महिलेच्या घरात 2024 साली चोरी झाली होती. या प्रकरणी महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपीला गजाआड केले होते. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल 12 तोळे सोने जप्त करण्यात आले होते. हा मुद्देमाल न्यायालयात हजर करण्यात आला.
शासनाच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत चिपळूण पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी रेवती रामदास शिर्के (रा.कापसाळ) यांचे चोरीस गेलेले 12 तोळे सोन्याचे दागिने न्यायालयाचे आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांच्या हस्ते महिलेला सुपूर्द करण्यात आले.
सदर ऐवज फिर्यादी यास सन्मानपूर्वक परत करण्यात आला. सदर वेळी रेवती शिर्के यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले
चोरीस गेलेले 12 तोळे सोने चिपळूण पोलिसांनी महिलेला केले परत
