खेड : लोटे एमआयडीसी येथील पुष्कर कंपनीजवळील गटारात पडून 23 वर्षीय तरुण जखमी झाला होता त्याच्या उजव्या पायाचे हाड मोडले होते तसेच गटारातील केमिकल युक्त पाण्यामुळे त्याचे शरीर काळे पडून तो जखमी झाला होता ही घटना 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता घडली होती. त्याला उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. विकास राजेश सोनी (23 गणेश खरात चाळ,लोटे माळ खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत खेड पोलिसात के ई एम हॉस्पिटल मुंबई यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.