रत्नागिरी : कर्नाटक येथील 24 वर्षे तरुणीचा सिविल हॉस्पिटल येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला श्रीदेवी नागेश रायपनोर (24, कर्नाटक, सध्या नवाथे पॅराडाईज रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी हिला ताप येत असल्याने औषध उपचारासाठी मुकादम हॉस्पिटल कुंवारबाव रत्नागिरी येथे 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना तिचे रक्ताचे रिपोर्ट व एक्स-रे करण्यात आले. रिपोर्टनुसार डॉक्टरांनी श्रीदेवीच्या पांढऱ्या पेशी खूपच कमी झाल्याचे सांगितले, तसेच तिच्या फुफ्फुसालाही इन्फेक्शन झाले होते. तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना 25 रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पांढऱ्या पेशी कमी झाल्याने कर्नाटकातील तरुणीचा उपचारादरम्यान रत्नागिरीत मृत्यू
