चिपळूण : विजापूर गुहागर महामार्गाने चिपळूणकडे येणाऱ्या बुलेटस्वाराने दुसऱ्या दुचाकीला विरूध्द दिशेला जावून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बुलेट स्वार राहुल रामचंद्र जाधव (३५, पिंपळी खुर्द, चिपळूण, मूळ सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील प्रदीप शंकर मोहिते (४९, कोळकेवाडी, चिपळूण), अधिक रामचंद्र बुधे (मूळ सांगली) हे जखमी झाले होते. तसेच बुलेटस्वार राहुल जाधवही जखमी झाला होता. याबाबतची फिर्याद प्रदीप मोहिते यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार बुलेटस्वार राहुल रामचंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.