खेड / प्रतिनिधी
तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव-मोहल्लानजीक डम्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. या प्रकरणी रोहित हरी जाधव (19, रा. चिंचघर -दस्तुरी) याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमीर इलियास खान (20), अक्सा मोहतसीम खडस (25, दोघे रा. डाकबंगला, मूळगाव बहिरवली- चौगुले मोहल्ला) अशी जखमींची नावे आहेत. अक्सा खडस ही एम.एच.08/बी.ए. 9385 क्रमांकाच्या दुचाकीवरून अमीर खान याच्यासमवेत डाकबंगला येथून बहिरवलीकडे जात असताना समोरून येणाऱ्या एम.एच.08/डब्ल्यू 8258 क्रमांकाच्या डम्परने धडक दिली. अपघातात दोघांनाही दुखापती झाल्या असून दुचाकीचे नुकसान झाले.
खेडमध्ये डम्परची दुचाकीला धडक, दोघे जखमी
