संगमेश्वर : रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरून आंबा घाट मार्गे देवळे फाटा येथे जाणाऱ्या ट्रॅकर ट्रेलरने (आरजे २७, जीडी ३५८८) दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या – सुमारास घडली होती. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांतिलाल सासिया मिणा (२५, मूळ राजस्थान, सध्या देवळे, संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतिलाल मिणा हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर घेवून आंबा घाट येथून देवळे कॅम्प येथे चालला होता. यावेळी देवळे फाटा येथे आला असता एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अवधूत कोळी (२४, सांगली), सचिन सुतार हे दोघेजण जखमी झाले. तसेच गाडीचे नुकसान झाले. या अपघात प्रकरणी कांतिलाल मिणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर देवळे येथे ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीवरील 2 जखमी, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा
