चौघांवर गुन्हा दाखल, गाडीसह मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : तालुक्यातील रनपारमधील फिनोलेक्स कंपनीतील लोखंडी सामानाची चोरू करून पळणाऱ्या चौघांपैकी एकाला गाडीसह पकडण्यात सिक्युरिटी गार्डला यश आले. तर तिघेजण फरार झाले आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश गणेश पाटील (३०, सध्या कोकणनगर रत्नागिरी, मूळ शिवार आंबेरे, पाटीलवाडी), दीपक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व अन्य दोन (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आदेश पाटील याला गाडीसह पकडण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद रमेश मोहन कदमम (फिनोलेक्स सिक्युरिटी गार्ड, मूळ खेडीं, चिपळूण) याने पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कदम हे गेली १० वर्षे फिनोलेक्स कंपनीत सिक्युरिटी आहेत. २३ जानेवारी रोजी ते डयुटीवर असताना रात्री १०.३० च्या दरम्याने वरील चौघेजण फिनोलेक्स कंपनीच्या जागेतील भंगारासाठी ठेवलेले लोखंडी साहित्य बोलेरो गाडीत भरून नेताना रमेश यांनी पाहिले. त्यांनी गाडीचा पाठलाग केला. त्यांच्या गाडीला मौजे गोळप शिरंबाडवाडी येथे पकडले. त्यातील तिघेजण फरार झाले. आदेश पाटील याला पकडून गाडीसह पूर्णगड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडील साडेदहा हजाराचे लोखंडी साहित्य व गाडी जप्त करण्यात आली. त्याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिनोलेक्स कंपनीत चोरी करून पळणाऱ्यांना सिक्युरिटीने पाठलाग करून एकाला पकडले, तिघे फरार
