राजन लाड / जैतापूर
राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे 28 जानेवारीला वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित कोर्टात खेचीन या नाटकाचा नाट्य प्रयोग तालुक्यातील श्री देव गणेश कृपा प्रासादिक कला क्रीडा मंडळ बाकाळे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी नाट्यप्रयोग सादर करीत असतात . यावर्षी २ अंकी धमाल विनोदी वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित कोर्टात खेचीन या नाटकाचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे .
बाकाळे-काजुरमळी येथील स्थानिक कलावंत दरवर्षीप्रमाणे आपली नाट्य सेवा बजावणार असून गेल्या वर्षी या मंडळाने मुंबईकर चाकरमान्यांच्या सहकार्याने शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे सूनबाई तोऱ्यात या नाटकाचा हाऊसफुल नाट्य प्रयोग सादर केला होता.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी गंगाराम गवाणकर लिखित कोर्टात खेचीन या नाटकाचा नाट्य प्रयोग सादर होणार असून त्याचे दिग्दर्शन सुरेश चेऊलकर यांनी केले असून व्यवस्थापन बाकाळे काजुरमळी ग्रामस्थ करीत आहेत
विषेश सहाय्य पत्रकार राजन लाड, सागर कुवेसकर यांचे लाभले असून यामध्ये सुरेश चेऊलकर,रुपेश चव्हाण, अजयकुमार रांबाडे, सुनिल रांबाडे,नवनाथ तारकर, महेंद्र पोवार,भुपाल तारकर, मंदार जोशी, सुजन दांडेकर, मंजिरी कणेरी ,अनुष्का पंगेरकर हे स्थानिक कलाकार भूमिका साकारत आहेत
मंगळवार दि. २८/०१/२०२५ रोजी रात्रौ ठिक १०.०० वाजता जि.प.आदर्श शाळा बाकाळे रंगमंच येथे या नाटकाचा शुभारंभ प्रयोग होणार आहे .
राजापूर बाकाळे येथे 28 रोजी ‘कोर्टात खेचिन’ नाट्यप्रयोग
