शनिवार – रविवार सुट्टीचा रत्नागिरीसह पर्यटकांनी लुटला आनंद
रत्नागिरी : सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे रत्नागिरीतील समुद्र किनारी गर्दीने फुलले होते. पर्यटक आणि रत्नागिरीकरानी समुद्र स्नानाचा आनंद लुटला. रविवारी 26 जानेवारी रोजी गणपतीपुळे, आरेवारे, मांडवी, भाट्ये समुद्र किनारी तोबा गर्दी दिसून आली.
शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवस शासकीय कर्मचाऱ्याना सुट्टी असल्याने या दिवसांचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्याला पसंती दर्शवली होती. प्रजासत्ताक दिन रविवारीच असल्याने सायंकाळच्या सुमारास आरे वारे, गणपतीपुळे समुद्र किनारे गर्दीने तुडुंब भरले होते. आरे वारे समुद्र किनारी दुचाकी, चारचाकी वाहनांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली होती. जवळपास 1 किलोमिटर पर्यंत या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरही गर्दी झाली होती. या प्रचंड गर्दीने स्थनिकाना व्यवसाय तेजीत होता.
गणपतीपुळे समुद्र किनारी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथील पर्यटकांनी गर्दी केली होती. येथील समुद्र किनाऱ्यावर समुद्र स्नानासह उंट सवारी, घोडे सवारी, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटला. सर्वच किनाऱ्यावर गर्दी झाल्याने स्थानिकांना या दिवशी चांगला रोजगार मिळाल्याचे बोलले जात आहे.
गणपतीपुळे, आरे – वारे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
