वार्षिक स्नेहसंमेलनात कर्मचाऱ्यांचा सन्मान
संदीप घाग / सावर्डे
विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी कोणतेही काम करा; पण उत्कृष्टपणे करा, असे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले.
सावर्डे येथील कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. ते म्हणाले, या रुग्णालयात १५ वर्षांपूर्वी आलो होतो. श्री क्षेत्र डेरवण हे विविध प्रकारे विकसित झाले आहे. जरी सर्व काही बदलले असले तरीही येथील श्री क्षेत्राचा हेतू बदलला नाही. रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट वैद्यकीय सोयीसुविधा, येथील डॉक्टर्स, नसेंस यांचे काम चांगले आहे. याप्रसंगी श्रेयस यांनी
वालावलकर रुग्णालयातील मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, स्पोर्टस् अॅकॅडमीची तसेच त्यांनी न्युक्लिअर मेडिसिन, लीनियर एक्सिलरेटर विभागाला भेट दिली. या कार्यक्रमात संस्थेचे रुग्णालयात उपचारांसाठी मार्ग दाखवणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा, समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. संगमेश्वरचे संजय शिंदे, मार्गताम्हणेचे मनोहर चव्हाण, खेडचे सुरेश पवार, जळगावचे संदीप देसाई, दापोलीचे किरण पावसे, शृंगारतळीचे कासम सालेह, विश्वस्त मैत्री ग्रुप पोलादपूरचे उदय खरे यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला.