मनोहर धुरी / राजापूर
राजापूर तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा बाकाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी विविध शालेय कार्यक्रमानी संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी 8 वा ध्वजारोहण, सकाळी 8.30 मि प्रभात फेरी सकाळी 9 वा श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी 3 ते 5 वा हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 7 ते 7.30 वाजता स्वागत व बक्षीस समारंभ, रात्रौ 8 वा विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक व अध्यक्ष शाळा समिती शाळा बाकाळे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद शाळा बाकाळेचे उद्या वार्षिक स्नेहसंमेलन
