रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे फिशिंग बोट कन्स्ट्रक्शन अँड मरीन इंजिन या विषयांतर्गत फायबरग्लास मासेमारी नौका बांधणी तंत्रज्ञानाच्या सखोल अभ्यासासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर, आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांची परवानगी आणि मार्गदर्शनाखाली कार्यानुभव कालावधीमध्ये श्री फायबर वर्क्स, कासारवेली, रत्नागिरी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थी, विविध प्रकारचे फायबर मासेमारी नौकांचे फायबर साचे तयार करणे व साच्यापासून नौका तयार करून त्यावर डेक, केबिन तयार करणे तसेच डेकवरती विविध प्रकारची मासेमारी साधने बसविणे आणि इंजिन व त्यांची उपकरणे बसवून नौका कार्यान्वित करणे याचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव घेत आहेत. श्री. दीपक ठोंबरे, श्री. शांताराम दिंगणकर, श्री. दिनेश जोशी, श्री. नितेश दींगणकर, श्री. प्रकाश पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फायबर मासेमारी नौका बांधणी कशी केली जाते याचे ज्ञान अर्जित करत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये तीन विद्यार्थिनी ईशा भोळे, रुची भोळे, सायली लोंढे व दोन विद्यार्थी संचित वाघे, अथर्व परब, या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक निलेश मिरजकर, यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य / सहयोगी अधिष्ठाता, डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
रत्नागिरीत मत्स्य अभियांत्रिकी विद्यार्थांचे श्री फायबर वर्क्स फायबर मासेमारी नौका बांधणी प्रशिक्षण
