खेड :शहरातील तीनबत्तीनाका येथील एका हॉटेलमधून 50 हजार रूपये किंमतीचा दोन मोबाईल चोरल्याप्रकरणी के. रामचंद्र (42, रा. कर्नाटक) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मनोज शिवाजी पाटील यांनी तक्रार नोंदवली आहे. हॉटेलमधून मोबाईल चोरीस गेल्याचे बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानक गाठले. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला.