रत्नागिरी:-रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये उबाठा सेनेला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. हरचिरी जिल्हा परिषद गटामध्ये उबाठाचे विभागप्रमुख महेंद्र झापडेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापतींसह सरपंच, उपसरपंच यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. चांदेराई, कोंडवी, कुरतडे, हरचिरी, टेंभ्ये, टिके, भातडेवाडी गावातील ग्रामस्थांनी मोठया संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेत विभागप्रमुख महेंद्र झापडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह उबाठामधून शिवसेनेत प्रवेश केला. मागील अडीच वर्षात या भागातील विकास कामे ठप्प झाली होती. मात्र पुढील दोन महिन्यातच या गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचा शब्द पालकमंत्री सामंत यांनी महेंद्र झापडेकर व ग्रामस्थांना दिला आहे. मागील अनेक महिने हा भाग विकासापासून मागे राहिला होता. आता पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे वेगाने होतील आणि नागरिकांच्या समस्या दुर होतील असा विश्वास महेंद्र झापडेकर यांनी व्यक्त केला.
विभागप्रमुख झापडेकर यांच्यासह माजी जि.प. सदस्या देवयानी झापडेकर, चांदेराईमधील शाखाप्रमुख संजय आंब्रे, माजी सरपंच संजना शिगवण, उपसरपंच समिक्षा सुर्वे, माजी सरपंच इस्माईल खान, शाखाप्रमुख संजय शिगवण, चंद्रकांत शिंदे यांच्यासह चांदेराईतील शेकडो शिवसैनिक, कोंडवी गावातील गावकर गोपीनाथ निंबरे, प्रभारी सरपंच मंगेश निंबरे, शाखाप्रमुख काशिनाथ पवार व शिवसैनिक, कुरतडे गावातील सरपंच प्रतिक्षा पालवकर, माजी सरपंच व ग्रा.पं. सदस्या ज्योती रहाटे, माजी सरपंच प्रफुल्ल भातडे, भिकाजी फुटक, ग्रा.पं.सदस्य मंगेश भातडे, उपसरपंच सुरज जाधव, शाखाप्रमुख आदेश वीर, गावकर नारायण पालवकर, माजी सरपंच गुरुनाथ पालवकर, ग्रा.पं. सदस्या विधी फुटक, वाडीप्रमुख मनोहर भातडे, माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश वीर, उपशाखाप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, टिके गावातील वाडीप्रमुख गजानन कांबळे, टिके सरपंच भिकाजी शिनगारे, उपसरपंच संजय भातडे, महिला विभागप्रमुख प्राजक्ता गोवीळकर, ग्रा.पं.सदस्य महेश आलीम, नेहा वारिशे, वसंत आलीम, विजय वारिशे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठया संख्येने प्रवेश केला. टिके भातडेवाडीतील चंद्रकांत कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ प्रवेशावेळी उपस्थित होते. टेंभ्ये उपविभागप्रमुख जगन कीर, समीर नागवेकर, विजय साळवी, संतोष साळवी, उपसरपंच तुषार नागवेकर, नरेंद्र नागवेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हरचिरी सरपंच दत्ताराम येरीम, उपसरपंच फरहा बुखारी, माजी सरपंच चंद्रशेखर मांडवकर, संतोष पांचाळ, शाखाप्रमुख नासीर बुखारी, विजय मांडवकर, गावकर बाळकृष्ण भातडे यांच्यास शिवसैनिक उपस्थित होते. हरचिरी बौध्दवाडीतील प्रशांत पवार, प्रकाश पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.