खेड : सीएसएमटी-मुंबई स्थानकासह मस्जिद स्थानकादरम्यान 25 जानेवारीपासून वाहतुकीसह ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या 9 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
25, 26, 27 जानेवारी व 1, 2, 3 फेब्रुवारी या दरम्यान हा ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे 12052 क्रमांकाची जनशताब्दी एक्स्प्रेस 25 रोजी दादर स्थानकापर्यंत धावेल. 22110 क्रमांकाच्या एक्स्प्रेसचा प्रवास 25 रोजी दादर स्थानकात संपेल. 12134 क्र.ची मंगळूर एक्स्प्रेसही दादर स्थानकापर्यंतच धावेल. 20112 क्र.च्या कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास 25 रोजी 30 मिनिटे नियंत्रित केला जाईल. 12051 क्रमांकाची सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 26 रोजी 20 ते 30 मिनिटे उशिराने सुटेल. 22229 क्र.ची सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसही 26 रोजी 20 ते 30 मिनिटे उशिराने सुटेल. 22119 क्र.ची सीएसएमटी मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस 26 रोजी 20 ते 30 मिनिटे उशिराने सुटेल. 12052 क्र.ची जनशताब्दी एक्स्प्रेस 26 रोजी दादर स्थानकापर्यंत धावेल. 22120 क्र.ची तेजस एक्स्प्रेसही 26 रोजी दादर स्थानकापर्यंतच धावेल. या बदली प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.