खेड / प्रतिनिधी:-शहरातील तीनबत्तीनाका येथील मोकळया जागेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका जुगार अड्डयावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून 1,440 रूपयांचा ऐवज जप्त केला. प्रशांत महादेव सुतार (28, रा. भडगाव) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो एका दैनिकातील शुभअंकावर मटका जुगाराचा खेळ खेळवित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या बाबत पोलीस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.