ऑफ्रोह रत्नागिरीच्या महिला मेळाव्यात राज्याध्यक्ष अनघा वैद्य यांची ग्वाही
रत्नागिरी(प्रतिनिधी):ऑफ्रोहचे सभासद टिकून रहा. माझं काम झालंय. माझा प्रश्न सुटलाय. आता मला काय करायचं आहे समाजाशी?असा विचार डोक्यात सुद्धा आणू नका .नोकरीचा प्रश्न सुटला.पुढे आपण आपल्या येणा-या पिढीचा प्रश्न हाती घेवू या..त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑफ्रोह संघटना नेहमीच कार्य करत राहील,अशी ग्वाही ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य यांनी दिली.
ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडी शाखा रत्नागिरीच्या वतीने नुकताच कुवारबाव (ता.रत्नागिरी)येथील जेष्ठ नागरिक संघ सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.या महिला मेळाव्यात’ राजमाता जिजाऊ व सध्याची परिस्थिती’या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान, हळदीकुंकू कार्यक्रम व सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री, N-6 आयस्क्रीमच्या संचालिका व महावितरण रत्नागिरी परिमंडळच्या वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन विभाग)
सौ.प्रणालीताई निमजे , केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कोळी महादेव समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या मिराताई कोलटेके , तर प्रमुख प्रबोधनात्मक व्याख्याते म्हणून ऑफ्रोह सातारा महिला आघाडीच्या पदाधिकारी राणी जाधव यांच्यासह ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष व मंत्रालयातील महिती व जनसंपर्क विभागातील स्टेनोग्राफर प्रियाताई खापरे, राज्य सचिव निता सोमवंशी, कोषाध्यक्ष वंदूताई डेकाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेखा धकाते, गुहागर तालुक्यातील आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, वेळंबच्या सरपंच समीक्षा बारगोडे, नुकताच 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कारयक्रमासाठी निवड झालेल्या पोमेडी बु.च्या सरपंच ममता जोशी ,
रायगडच्या जिल्हाध्यक्ष राजश्री बंदरी,कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्ष संगिता गोलाईत, साताराच्या जिल्हाध्यक्ष अंजलीताई बेसके,ठाणेच्या जिल्हाध्यक्ष रेखा पाटील,रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष उषाताई पारशे,ऑफ्रोह उपाध्यक्ष नंदाताई राणे,ठाणे माहीला आघाडी जिल्हाध्यक्ष स्मिता भोईर, इंदूताई सहारकर, कुंदाताई सोनपरोते, इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ऑफ्रोह साताराच्या महिला आघाडी पदाधिकारी व श्रीम. राणी जाधव मॅडम यांचे “राजमाता जिजाऊंचे हिंदवी स्वराज्य स्थापनेतील स्थान व सध्याची परिस्थिती” या विषयावर अत्यंत प्रभावी जोशपूर्ण व्याख्यानाने सभागृह मंत्रमुग्ध झाले.
ऑफ्रोह महिला आघाडीच्या ठाणे,रायगड, सातारा,कोल्हापूर जिल्हाध्यक्षांसह ठाणे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी,सचिव घनश्याम हेडाऊ,साताराचे ऑफ्रोह चे मार्गदर्शक सुरेश गायकवाड,ऑफ्रोह राज्य प्रसिध्दीप्रमुख व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, यांच्यासह ऑफ्रोह चे विविध जिल्हा व राज्यपदाधिकारीही उपस्थित
होते. यावेळी प्रणाली निमजे,प्रियाताई खापरे,मिराताई कोलटेके,सरपंच वैष्णवी नेटके,कोषाध्यक्ष वंदूताई डेकाटे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती, गुहागर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील अमुल्य योगदान देणारे व कर्तव्यदक्ष कृषी विस्तार अधिकारी तसेच ऑफ्रोह चे राज्यप्रसिध्दीप्रमुख ,रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांचा स्वेच्छानिवृत्तीबद्दल ऑफ्रोह विविध जिल्ह्याशाखेच्या तसेच राज्य ऑफ्रोह च्या वतीने ऑफ्रोह महिला आघाडीतर्फे मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऑफ्रोह च्या माजी उपाध्यक्ष सिंधुताई सनगळे यांनी तर आभार प्रदर्शन ऑफ्रोह रत्नागिरी सचिव किशोर रोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑफ्रोह रत्नागिरीतील महिला आघाडी कार्याध्यक्ष राजकन्या भांडे,उपाध्यक्ष
सुनंदाताई फुकट, सचिव स्वाती रोडे, सहसचिव प्रतिभा रोडे, ऑफ्रोह कार्याध्यक्ष बापुराव रोडे, कोषाध्यक्ष सतीश घावट यांच्यासह अनेक सभासदांनी परिश्रम घेतले.