तुषार पाचलकर / राजापूर:-तालुक्यातील ओझर तेलीवाडी येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू व वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी कंपनीच्या बियर विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार दामोदर कुर्ले (५४, ओझर तेलीवाडी ) असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल प्रताप घाटगे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार प्रौढावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 23 जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.