विविध कार्यक्रमांचे आयोजन
संदीप घाग / सावर्डे-चिपळूण तालुक्यातील नायशी गावचे ग्रामदैवत केदारनाथच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त समाजसेवा संघ नायशी, ता. चिपळूण तर्फे जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त 3 दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत.
◼️रविवार २६ जानेवारी – सकाळी ८ वा. जिल्हास्तरीय नायशी कोकण केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा
घाटी जोडी – प्रवेश फी ८००, २०० रुपये
प्रथम क्रमांक- २१ हजार
द्वितीय क्रमांक – १८ हजार
तृतीय क्रमांक – १५ हजार
चतुर्थ क्रमांक – १० हजार
पाचवा क्रमांक – ५ हजार व आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे.
◼️ गावठी अ गट – प्रवेश फी ७००, २०० रुपये
प्रथम क्रमांक ११ हजार,
व्दितीय क्रमांक ८ हजार,
तृतीय क्रमांक ६ हजार,
चतुर्थ क्रमांक ४ हजार व पारितोषिक
◼️गावठी ब गट – प्रवेश फी ५००, २००
प्रथम क्रमांक – १० हजार,
व्दितीय क्रमांक ८ हजार,
तृतीय क्रमांक ६ हजार,
चतुर्थ क्रमांक ४ हजार व आकर्षक चषक असे बक्षीस असणार आहे.
तसेच याच दिवशी रात्री ७ वाजता देवाला रुपे लावण्याचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता मनोरंजन कार्यक्रम होणार आहे.
◼️ सोमवार २७ रोजी सकाळी ८ वा. मंदिर प्रदक्षिणा, सकाळी ९.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ४.३० महिला हळदीकुंकूचाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते ७.४५ वाजता स्थानिक भजन, रात्री ९.३० वाजता नमनाचा मनोरंजन कार्यक्रम होणार आहे.
◼️मंगळवार २८ रोजी दुपारनंतर देवाची रुपे काढण्याचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समाजसेचा संघ नायशी कार्यमंडळाने व अध्यक्ष शिरीष घाग यांनी
केले आहे.