पावस : पत्नीच्या नावे घेतलेले बचतगटाचे कर्ज परत न केल्याने तीन महिलांनी शिवीगाळ व दमदाटी करून तरुणाला मारहाण केली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) दुपारी गोळप-परशुरामनगर येथे घडली.
फिर्यादी चंदन चंद्रकांत पावसकर (वय ३१) यांनी वर्षापूर्वी पत्नी अन्वी हिच्या नावे बचतगटाचे कर्ज घेतले होते. कर्ज मी परतफेड करतो, असे
सांगितले होते; मात्र कर्जाच्या हप्त्याची रक्कम परतफेड करत नसल्याने बचतगटाचे वसुली अधिकारी फिर्यादी यांच्या घरी कर्ज वसुलीसाठी येऊ लागले. म्हणून फिर्यादी हे बुधवारी गोळप परशुरामनगर येथे महिलांच्या घराजवळ जाऊन संशयित महिलांना कर्जाचे हप्ते भरा, असे सांगितले.
संशयित महिलांनी चंदनला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.