50 हजारांच्या जामीनावर सुटका
रत्नागिरी : परदेशी नागरिक आहे हे माहिती असूनही बांगलादेशी महिलेसोबत लग्न करुन भारतात वास्तव्य करण्यासाठी तिला सहाय्य करणाऱ्या पतीची न्यायालयाने ५० हजारांच्या जामिनावर सशर्त सुटका केली. त्याची पत्नी न्यायालयीन कोठडीतच आहे. राहिल मुराद भोंबल असे जामिनावर मुक्तता केलेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सलमा राहिल भोंबल (३०) ही बांगलादेशी नागरिक असूनही त्याने तिला भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला अशी कागदपत्रे तयार करुन फेडरल बँक व कॅनरा बँकेत खाते उघडून दिले. तसेच सलमा भोंबल ही तिच्या बांगलादेशचा पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करताना मिळून आली होती.