चिपळूण : शहरालगतच्या परशुराम घाटात ५ डिसेंबरला रात्री गाडी अडवून तिघांना मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील संशयित मोईन सदाकत पेचकर याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. बोरकर यांनी मोईन पेचकर याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.