लांजा:-तळेरे (जि. सिंधुदुर्ग) येथे आज गुरुवारी झालेल्या एनसीसी कॅडेट कवायत स्पर्धेत लांजा येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनसीसीच्या संघाने उत्कृष्ट कवायतीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकवला.
५८ महाराष्ट्र बटालियन ओरोस अंतर्गत, मुंबई विद्यापीठ आणि वी. वी. दळवी. कॉलेज, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या *सुभाष दिन’ निमित्ताने वी. वी. दळवी. कॉलेज, तळेरे येथे एनसीसी कॅडेट कवायत स्पर्धा आज गुरुवारी २३ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण आठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत लांजा येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनसीसीच्या संघाने उत्कृष्ट कवायतीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकवला.
या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, उपकार्याध्यक्ष सुनिल ऊर्फ राजू कुरूप, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये आणि सर्व संचालक व सल्लागार सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. सुनिल चव्हाण आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याकडून विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना ओरोस येथील एनसीसी विभागाचे मार्गदर्शक सुभेदार बेनुधर साहू आणि सीएचएम मा. राकेश पटेल यांनी बहुमोल प्रशिक्षण दिले. यामुळेच हे यश संपादित झाले आहे.
महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे सीटीओ प्रा. सिध्देश खवळे व सीटीओ प्रा. सौ. धनश्री पावसकर यांचेही संघाला मार्गदर्शन लाभले. विजेत्यांचे आणि एनसीसी विभागाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.