मेष : आज तुम्हाला नवीन संधीचा लाभ घेता येईल
मेष
मेष : आज तुम्हाला नवीन संधीचा लाभ घेता येईल. प्रलंबित आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाल; पण तुमची एखादी लहानशी प्रतिक्रिया देखील मोठे नुकसान करू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल
वृषभ
वृषभ : आज आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. नाते चांगले ठेवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे चांगले ठरेल. घरातील बहुतांश कामे सुरळीत पार पडतील.
मिथुन : कोणावरही अविचारी टीका केल्याने तुमची बदनामी होवू शकते
मिथुन
मिथुन : आजचा दिवस तुम्ही आवडीनुसार व्यतित कराल. कोणावरही अविचारी टीका केल्याने तुमची बदनामी होवू शकते. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात फायदा होईल. रक्तदाबाची समस्या असलेल्या काळजी घ्यावी.
कर्क : मनोबलाच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता
कर्क
कर्क : आज मनोबलाच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यापारात नवीन करार होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आहाराकडे लक्ष द्या.
सिंह : आज निकटवर्तींना मदत कराल
सिंह
सिंह : आज निकटवर्तींना मदत कराल. विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होतील. मित्रांसोबतचे वाद टाळा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्याल. जोडीदाराशी थोडे मतभेद होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
कन्या : सरकारी कामात अडथळा येण्याची शक्यता
कन्या
कन्या : आज प्रेरणादायी व्यक्तीबरोबर झालेली भेट लाभदायक ठरेल. दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. सरकारी कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्यस्त असूनही तुम्ही कुटुंबासोबत वेळ व्यतित कराल. जोडीदाराचे घर आणि कुटुंबासाठी पूर्ण सहकार्य लाभेल.
तूळ : व्यवसाय वृद्धीसाठी वेळ अनुकूल आहे
तूळ
तूळ : सकारात्मक विचारातून कौटुंबिक प्रश्न सोडवाल. घरातील ज्येष्ठांची चिंता राहील. व्यवसाय वृद्धीसाठी वेळ अनुकूल आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
वृश्चिक : विचारांमध्ये नकारात्मकता निर्माण होऊ देऊ नका
वृश्चिक
वृश्चिक : धार्मिक कार्यांत सहभागी व्हाल. तुमच्या योजना योग्यरित्या सुरू करण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता निर्माण होऊ देऊ नका. कोणाशीही संवाद साधताना रागावर नियंत्रित ठेवा. आज व्यवसायात आश्चर्यकारक यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
धनु : कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यास तुमचे प्राधान्य असेल
धनु
धनु : आज कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यास तुमचे प्राधान्य असेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. महत्त्वपूर्ण व्यवसायिक कामेही पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर : बदलत्या वातावरणामुळे अॅलर्जीचा त्रास होण्याची शक्यता
मकर
मकर : आज विशेष व्यक्तीसोबत झालेली चर्चा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संवाद कौशल्याने समस्या सोडवाल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. कोणत्याही विषयावर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बदलत्या वातावरणामुळे अॅलर्जीचा त्रास होण्याची शक्यता.
कुंभ : सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल
कुंभ
कुंभ : आज कुटुंब आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या हाताळाल. भावंडांसोबतच्या संबंधांमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
मीन : तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो
मीन
मीन : आज तुम्ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहील.