चौघांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरातील कुवारबाव येथे पूर्ववैमनस्यातून २१ रोजी रात्री जोरदार राडा झाला. जावयाने मित्रांच्या सोबतीने दगड, बांबूने जोरदार मारहाण करत ४ जणांना जखमी केले. याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शिवराम पांडुरंग गराटे (५९, कुवारबाव, गराटेवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार विनोद दत्ताराम कांबळे (४५, लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे), कशीश विनोद कांबळे (३५, लक्ष्मीकांतवाडी मिरजोळे), समीर भाटकर (भाटकरवाडा, रत्नागिरी), छब्या नावाचा त्याचा मित्र अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम गराटे हे २१ जानेवारी रोजी रात्री ११.४५ वाजता घरात असताना पूर्ववैमनस्यातून त्यांच्या बहिणीचा जावई विनोद दत्ताराम कांबळे हा त्याची बायको कशीश विनोद कांबळे, समीर भाटकर आणि छब्या नावाचा त्याचा मित्र यांनी घरात घुसून शिवराम गराटे यांना दगडाने व लाकडी बांबूने जोरदार मारहाण केली. यावेळी त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या कोमल गराटे (४१), स्नेहल गराटे (२४), पायल गराटे (३८), अथर्व गराटे (२२) या चौघांना जोरदार मारहाण करत जखमी केले. जखमी शिवराम गराटे यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विनोद कांबळे त्याची बायको कशीश, समीर भाटकर, छव्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी कुवारबाव येथे पूर्ववैमनस्यातून जोरदार राडा; दगड, लाठ्या-काठ्यानी मारहाण, ४ जखमी
