गुहागर : तालुक्यातील जानवळे येथील विवाहित महिलेला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल असणाऱ्या उमेश शिंदे विरोधात अखेर पोलिसांनी कारवाई केली. रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली
पिग्मी संकलन करणाऱ्या जानवळे येथील विवाहितेजवळ अश्लिल भाषेत बोलत, धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील वेळणेश्वर येथील उमेश शिंदे याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुहागर पोलीस याबाबत चार दिवस होऊन ही कोणतीच कारवाई करत नसल्याने अनेक संघटना व महिला आक्रमक झाल्या होत्या. अनेक संघटनांनी याबाबत निषेधही व्यक्त केला होता. अखेर गुहागर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक तपास करीत असल्याचे सांगितले.
2:07 PM