रत्नागिरी : जिल्हा फोटोग्राफर व्हीडीओग्राफर असोसिएशन वतीने फोटोग्राफी संबंधीत व्यावसायिकांच्या भव्य मेळावाचे आयोजन शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी चिपळूण शहरातील श्री समर्थ उद्योग समूह कोकण चिपळूण ट्रेड सेंटर दुसरा मजला एस बी आय शेजारी चिंचनाका चिपळूण या हॉलवर सकाळी ९ ते सायंकाळी ४ यावेळेत होणार आहे. या मेळाव्यात व्यावसायीकांसाठी फोटोग्राफी व्यवसाय विषयी विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन पहिल्या सत्रात करण्यात आले आहे. या कार्यशाळेला फोटोग्राफी इंडस्ट्री मधील जेष्ठ उद्योजक विचारवंत मा.अरविंद कलबुर्गी सर मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत. दुपारच्या दुस-र्या सत्रात फोटोग्राफरचे प्रश्न अडचणी समजून घेण्यासाठी चर्चासत्र तसेच नवीन फोटोग्राफर साठी इच्छुक सभासद नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा हेतू फोटोग्राफर बंधूना काळानुसार व्यवसायात करावे लागणारे आवश्यक बदल ,आव्हान आणि संधी या बाबत जागृती करणे.जिल्हा संघटनेचे कार्य व कार्यपद्धती सर्वांपर्यंत पोहोचवणे जिल्हा.असो.ची नव्याने ध्येय धोरणे सर्वानुमते ठरवणे.संघटनेचे महत्व व भविष्यातील होणारे फायदे जाणून देणे.शासनाकडून मिळणा-र्या योजना सुसुविधा या बाबत माहीती देणे फोटोग्राफर्स बंधूचे अडीअडचणी, प्रश्न समजून घेणे.जिल्हा संघटनेच्या पुढील कार्यक्रमांचे सर्वानूमते नियोजन करणे.फोटोग्राफर बंधूना अडचणीच्या काळात मदत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
नविन इच्छुक फोटोग्राफर बंधूना स्वेच्छेने सभासद करून घेणे.जिल्हा कार्यकारणी मध्ये व सर्व तालुका असो च्या कार्यपद्धती मध्ये आवश्यकते नुसार बदल करणे,जिल्हयातील सर्व फोटोग्राफर बंधूना काळानुसार प्रगत प्रशिक्षित करून त्यांचा व्यक्तीगत,परिवाराचा तसेच समाजाचा उत्कर्ष साधणे.असा आहे.या कार्यक्रमाला जिल्हातील कोणीही फोटो स्टुडीओ मालक,व्यावसायिक फोटोग्राफर, व्हीडीओग्राफर, आऊटडोअर फोटोग्राफर, फोटो व्हीडीओ एडीटर ,ड्रोन ऑपरेटर प्रवेश मिळवू शकतो.प्रवेश विनामुल्य असेल.तसेच जिल्हा असो.वतीने सर्वांची मोफत भोजन व्यवस्था केली जाईल. मात्र रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. सोबत रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे.
https://surveyheart.com/form/678bd42fd7cbbf3bf8262c6e
.अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका असो.पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.असे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हीडीओग्राफर असो.वतीने कळविण्यात आले आहे.