संगमेश्वर प्रतिनिधी:-मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनल या रेल्वेमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशाने अचानक गाडीमधून उडी टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गिरेन अजित राजभोक्षी ( 31) असे सदर युवकाचे नाव आहे.
गिरेन अजित राजभोक्षी ( 31, रा रामपूर पोस्ट गोरेश्वर आसाम) हा युवक रेल्वे गाडी नंबर1100 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनल या रेल्वेमधून प्रवास करीत होता.
मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी दरम्यान ट्रॅकमन संतोष शंकर कळंबटे यांना रेल्वेचे कनिष्ठ अभियंता श्री जाधव यांनी मौजे भिरकोंड या ठिकाणी रेल्वे ट्रॅक वर पुरुष मयत झालेल्याचे दिसून आल्याचे त्यांनी फोन द्वारे कळवले त्यांनी पाहणी केल्या असता गिरेन राजभोक्षी हा मयत स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, आव्हाड, म्हैसकर ,रामपुरे आणि पंदेरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेचे नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. गिरेन राजभोक्षी याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून आत्महत्या का केली याबाबत समजू शकलेले नाही.