रत्नागिरी : शहरातील शेरे नाका येथील रिक्षा स्टॉप च्या बाजूला असलेल्या गटारावरील जाळी खाली धसली होती त्यामुळे त्यामधून वाहन घेऊन जाणे जिकिरीचे झाले होते. याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांचे नेतृत्वाखाली विभागअध्यक्ष शैलेश मुकादम यांनी न परिषदेला निवेदन दिले होत. त्यात त्यांनी म्हटले होते की जाळी खाली धसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. अनेक न प कर्मचारी येथून वावरत असतात एकालाही याबाबत कामं करावे असे वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. 15 दिवसांत दुरुस्ती काम करून नागरिकांना दिलासा द्यावा असे त्यांनी म्हटले होते. अखेर दुरुस्तीचे काम रत्नागिरी नगर परिषदेने सुरु केले.