रिल्स आणि व्हिडीओ व्हायरल, लाखो फॉलोअर्स
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूरहून महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या एका घाऱ्या डोळ्याच्या तरुणीने सगळ्यांना घायाळ करून टाकल आहे. कुंभमेळ्यात तिचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिचे एका रात्रीचे फोलोर्स वाढले. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सारखी दिसणारी ही तरुणी आहे तरी कोण? तीच नाव आहे मोनालिसाला.
गर्दीमुळे अस्वस्थ होऊन महाकुंभ सोडलेली मोनालिसा आता महाकुंभात परतली आहे. यावेळी ती स्वतःचे YouTube चॅनल घेऊन आली आहे.
महाकुंभ मेळ्यात रातोरात स्टार
इंदूरहून महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या मोनालिसा भोसलेला तिच्या सुंदर डोळ्यांनी स्टार बनवलं. तिचे रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले. एवढच नाही तर यानंतर तिचा एक मेकओव्हरचा व्हिडीओ आणि फोटोही समोर आले. तसेच तिचे फॉलोअर्सही तेवढेच दणक्यात वाढले आणि काहीच तासांत ती सोशल मीडियावरील चक्क सेलिब्रिटी झाली.
फोटो व्हायरल कसे झाले?
मोनालिसा जेव्हा महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकत होती तेव्हा तिला पाहून अचानक तिथे काही लोकांनी तिला घेरलं आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा हट्ट धरला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाले. आता ती एखाद्या हिरोईनला लाजवेल अशी सुंदर दिसत आहे.
महाकुंभ मेळ्यातील सुंदर डोळ्यांची ही तरुणी झाली एकाच रात्री सुपरस्टार
