खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी-गवाणकरवाडी फाटयाजवळ बोलेरो चालकाने एसटी बसला धडक देवून अपघात केल्याप्रकरणी चालक यासीन हैदरअली कुरेशी (26, रा. खंडाळा) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसचालक अजय आंब्रे हे आपल्या ताब्यातील बस (एम.एच. 14/बी.टी. 3016) घेवून मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना पाठीमागून येणाऱ्या बोलेरो पिकअपने (एम.एच.04/बी.सी. 6826) बसला धडक दिली. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी उशिरा बोलेरो पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.