खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील गुणदे-वावळीवाडी थांब्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात संतोष बाबू आंब्रे (48, रा. गुणदे-तांबडवाडी) जखमी झाले. अपघातप्रकरणी बसचालक हनुमंत विक्रम भाबड (39, एसटी आगार खेड) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष आंब्रे हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.08/ए.एफ. 9175) घेवून जात असताना समोरून येणाऱ्या बस (एम.एच 40/एन.9723) ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराला गंभीर दुखापत झाल्याने नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. हलगर्जीपणाने बस चालवून दुचाकीस्वारास जखमी करत दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.