प्रॉपर्टी तोंडी सांगून चालणार नाही, आता प्रत्यक्ष सिबिल रिपोर्ट पाहूनच लग्न ठरवणार!
मुलांचे नावे किती कर्ज, कोणत्या बँकेचा थकबाकीदार आहे का? प्रॉपर्टी किती आहे सारं काही दिसणार
रत्नागिरी : आधीच मुलांची लग्न जुळवताना नाकीनऊ येत आहेत. त्यात आता वराचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता सिबिल रिपोर्ट पाहूनच लग्न जुळवले जाणार आहे. त्यामुळे आता नुसत तोंडी सांगून चालणार नाही तर प्रत्यक्षात सिबिल रिपोर्ट पाहूनच तुमची प्रॉपर्टी पाहिली जाणार आहे. यामुळे वरच्या घरच्या मंडळींच टेन्शन अजूनच वाढणार आहे.
गेल्या दशक-दीड दशकांत मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. या पात्रता निकषांचे अडथळे पार करताना वर पक्षाला नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. मुली पाहताना वराला आपली प्रॉपर्टी किती याची माहिती द्यावी लागते. तेव्हा तिचे नातेवाईक लग्नासाठी तयार होतात. मात्र आता तोंडी बोलण्याला महत्व राहिलेलं नाही हे वधूच्या नातेवाइकांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे वराने किती प्रॉपर्टी सांगितली तरी विश्वास न ठेवता लग्न झाल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच शहाणपण सुचलं आहे.
यासाठी वधू पक्षाकडून सद्या वराचे किंवा त्याच्या आई वडिलांच्या पॅनकार्ड वरील माहिती अर्थात सिबील रिपोर्ट चेक करण्यात येत आहे. सिबील रिपोर्ट नुसार मुलाच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे. तो कोणत्या बँकेचा थकबाकीदार आहे का? तो कोणाला जामीन आहे का? अशी सगळी माहिती चेक करून मगच पुढची बोलणी होणारं आहेत. त्यामुळे आता लग्न करणाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे.