प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय अडीच लाख,
मालिकावीरसाठी दुचाकी बक्षीस, अन्य बक्षिसांची खैरात
सावर्डेच्या सह्याद्री क्रीडा नगरीत रंगणार रोमचंकरी क्रिकेट स्पर्धा
संदीप घाग / सावर्डे:-ज्या क्रीडा स्पर्धेची जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी वाट पाहत असतात ती क्रिकेट स्पर्धा म्हणजे आमदार शेखर निकम क्रिकेट चषक स्पर्धा. ही स्पर्धा
जिल्ह्यातील नावाजलेली क्रिकेट स्पर्धा आहे. यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सावर्डे येथील सह्याद्री येथील भव्य क्रीडांगणावर नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 5 मार्च ते 9 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा लीग मॅचेस पद्धतीनं खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत राज्यातील अनेक खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे दिग्गज खेळाडूंना पाहण्याची आणि त्यांची सुंदर खेळी अनुभवण्याची, जिल्ह्यातील खेळाडूंना वाव मिळावा आणि क्रीडा रसिकांना आनंद लुटता यावा यासाठी आमदार निकम चषक स्पर्धा आयोजित करण्यात येते.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 5 लाख रुपये असणार आहे, तर द्वितीय पारितोषिक अडीच लाख आहे,
मालिकाविरसाठी यामाहाची दुचाकी ठेवण्यात आली आहे. याशिवाय अन्य वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी भाग घेण्याचे आवाहन यंग बॉईज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष उद्योजक केतन पवार उपाध्यक्ष उद्योजक सचिन पाकळे, सावर्डे यांनी केले आहे. ही स्पर्धा आमदार सह्याद्रीचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघाना 50000 प्रवेश फी भरावी लागणार आहे.
अधिक माहितीसाठी गणेश सावर्डेकर (9923280095), देवराज गरगटे (9850589061),
उमेश राजेशिर्के (7972590073),
प्रथमेश पवार (8169849640),अमित सुर्वे (95522520) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे.