रत्नागिरी:-राजापूर तालुक्यातील गोठणे येथील तरुणाने विषारी द्रव प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा जितेंद्र सहदेव पांचाळ (34, रा.गोठणे दोनीवडे, राजापूर) असे मृताचे नाव आहे. जितेंद्र हा गेली सात वर्षे मानसिक आजारी होता. 19 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. सुमारास त्याने उंदीर व मुंग्या मारण्याचे विषारी द्रव प्राशन केले. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल़े याठिकाणी त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. 20 जानेवारी रोजी पहाटे जितेंद्रचा मृत्यू झाला. अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.