रत्नागिरी:-शहरातील साळवी स्टॉप येथे वृद्धाने दारु समजून फिनेल प्राशन केल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना 19 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. रविंद्र जयराम सुर्वे (68,रा.वक्रतुंड अपार्टमेंट साळवी स्टॉप,रत्नागिरी) फिनेल प्राशन केल्यानंतर रविंद्र यांना अत्यवस्थ वाटू लागले. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.