रत्नागिरी:-शहरानजीकच्या टीआरपी येथे अज्ञात कारणातून प्रौढाने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल़ा ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अनिल संग्राम म्हस्के (48, रा.आदित्य नगर टीआरपी, रत्नागिरी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया प्रौढाचे नाव आहे. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत.
अनिल म्हस्के याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास राहत्या घरातील छताच्या फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो लटकत असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने आरडा-ओरडा केला. यावेळी शेजाऱयांनी त्यांची आर्त किंकाळी एकून घरामध्ये आले. शेजाऱयांनी त्याच्या गळ्यातील फास सोडवून त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.