उदय दणदणे / गुहागर
कोकणातील नमन लोककला व लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रखरपणे लढा देत शासन स्तरावर “नमन महोत्सव” सुरू करायला भाग पाडणारी
महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था अर्थात नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड भारत ह्या संस्थेने नमन ह्या लोककलेला राजमान्यता मिळण्याबरोबरच, कलाकारांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने गतिशील कार्यपद्धतीचे धोरण आखले असून त्याच अनुषंगाने नमन लोककला संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण या ठिकाणी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले असून सदर सभेस उपरोक्त संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच संस्थेच्या वतीने शासन दरबारी केलेल्या मागण्या आणि त्यातून सर्वांच्या सहकार्याने मिळालेले यश तसेच संस्थेची पुढील वाटचाल यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून ज्या ज्या तालुक्यात संस्थेची शाखा बांधणी बाकी आहे तिथे शाखा बांधणी करण्यात येणार असून सदर सभेत शाखेची विधीवत निर्मीती करून पदाधिकारी निवड करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सभेचे ठिकाण आणि वेळ पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
■ सकाळी- १० वाजता, तालुका रत्नागिरी: गारवा हॉटेल ,जाकादेवी (रत्नागिरी)
■ दुपारी- ०३ वाजता, तालुका संगमेश्वर: जेष्ठ नागरिक संघ सभागृह,(भुवड कॉलनी,महालक्ष्मी गॅस एजन्सीच्या पुढे) देवरुख कॉलेज रोड, देवरूख
■ सायंकाळी- ०५ वाजता, तालुका चिपळूण: कन्या शाळा,पागझरी (चिपळूण तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला) चिपळूण
या सभेला नमन मंडळ व त्यांचे प्रतिनिधी सह कलावंत यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नमन लोककला संस्थेचे महासचिव शाहीद खेरटकर यांनी केले आहे.