रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये बांगलादेश हे नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहत असल्याचे उघड झाले आहे. नुकतीच साळवी स्टॉप येथे एका बांगलादेशी महिलेला अटक केल्यानंतर आता आणखी एक बांगलादेशी महिला रत्नागिरीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी एटीएस आणि पोलिसांनी ट्रॅप लावला आहे. बांगलादेशी यांची जिल्ह्यातील वाढती संख्या पाहून दिलेल्या याकडे विशेष लक्ष आहे दररोज होणाऱ्या घडामोडींची माहिती हे पथक घेत आहे दहशतवाद विरोधी पथक आणि शहर पोलिसांनी साळवी स्टॉप येथे बांगलादेश हे महिलेविरुद्ध कारवाई केली या महिलेला अटक करण्यात आली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे. सलमा राहील बोंबल (30) असे तिचे नाव आहे. ही महिला बांगलादेशातील असून समला मुल्ला असे तिचे नाव आहे परंतु ती रत्नागिरी सलमा राहील बोंबल या नावाने पाच वर्षाहून अधिक काळ वास्तव्यास आहे.
राहील बोंबल आणि तिचे मुंबईत ओळख झाली होती बोंबल हे सावर्डे येथील आहे सलमा हिने भारतीय नागरिक नसूनही तिने भारत देशातील अनेक पुरावे तयार केले आहेत आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आदि पुरावांचा यामध्ये समावेश आहे.
आता रत्नागिरीत आणखी एक बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस आणि एटीएस पथकाला मिळाले आहे. त्या दृष्टीने रत्नागिरीत सापळा रचण्यात आला आहे. लवकरच या महिलेला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.