रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरटयाने लांबवल्याचा प्रकार समोर आला. ही घटना गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. शौकत अब्दुल्ला अली (32) असे या प्रवाशाचे नाव आहे. शौकत यांनी चोरीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शौकत हे 16 जानेवारी रोजी कोकण रेल्वे मार्गावरील केरला संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीने प्रवास करत होते दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आली. रत्नागिरी येथून गाडी सुटत असताना शौकत यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरटयाने चोरुन नेला अशी तक्रार रत्नागिरी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरटयाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम (305)(क) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.