खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या गेट नं. 3 समोरील सर्व्हिसरोडलगत उभी केलेली 30 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनी पल्सर दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विश्वनाथ पंडे (25) यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. 14 जानेवारी रोजी रात्री 11.45 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या मुदतीत दुचाकी (एम.एच. 08 ए.टी. 4487) अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रारीत म्हटले आहे.